‘डीपर’तर्फे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 9 महिने राज्यस्तरीय मोफत प्रशिक्षण
(दि. 7 डिसेंबर 2020 ते दि. 30 ऑगस्ट 2021 - रोज रात्री 9 ते 11 वाजता)
राज्यातील PCMB विषयाच्या शिक्षकांना लाभ घेण्याचे ‘डीपर’तर्फे आवाहन
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची विज्ञानातील आणि गणितातील रुची वाढावी, पाया भक्कम व्हावा,
विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगसारख्या विभागात सहज प्रवेश मिळावता यावा, विशेषतः राज्यातील ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांचे क्षमतासंवर्धन व्हावे यासाठी डीपर
ही सामाजिक संस्था प्रयत्नशील आहे.
आपल्या राज्यातील विज्ञान शाखेतील (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी) शिक्षकांना 'डीपर' मार्फत मोफत
ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण राज्याला उत्कृष्ट शिक्षक देणार आहे. त्यासाठी संस्थेने
सर्व तयारी केली असून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे. राज्यातील 900 पेक्षा जास्त
शिक्षक त्याचा लाभ घेत आहेत.
राज्यातील सर्व विज्ञान शिक्षकांनी/प्रमुखांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला तर आपल्या विद्यार्थ्यांना ते
उत्तम मार्गदर्शन करू शकतील. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध
होण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा हाच मुख्य उद्देश आहे.
आज राज्यात शिक्षकांना या पध्दतीने मार्गदर्शन करणारी कोणतीही शासकीय यंत्रणा नाही, सामाजिक भावनेतून डीपर
ही अराजकीय स्वयंनिर्वाही सामाजिक संस्था शिक्षकांना प्रशिक्षण देवून शासनाच्या कामात सहकार्य करु इच्छिते
आहे. या विद्यार्थीहिताच्या प्रयत्नांना समाजातील सर्व स्तरातून अनुकूल प्रतिसाद अपेक्षित आहे.
हे प्रशिक्षण दि. 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे. 30 ऑगस्ट 2021 पर्यंतचे वेळापत्रक तयार आहे. यापूर्वीच 1 नोव्हेंबरपासून एक महिन्याचा पायलट प्रोजेक्ट केलेला आहे आणि 900 शिक्षक आतापर्यंत सहभागी झालेले आहेत व ते रात्री 9 ते 11 या सुविधेचा लाभ घेत आहेत. गुणवत्तेच्या पातळीवर उत्तम काम सुरू आहे. याची व्याप्ती वाढून या प्रशिक्षणाचा फायदा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना घेता यावा त्यासाठी आपल्या परिचित अश्या शिक्षकांना ही माहिती पाठवावी.
प्रशिक्षण देण्याची उद्दीष्टे:
1. देशपातळीवरील NEET / JEE प्रवेश परीक्षेतील महाराष्ट्र राज्याचा घसरलेला निकाल परत मिळविणे.
2. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे कोणाताही विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री करुन
काळजी घेणे.
3. एनईईटी / जेईई / एमएचटी-सीईटीच्या अभ्यासक्रमातील बारकावे जाणून, अचूक प्रश्नपत्रिका तयार व्हावी यासाठी
शिक्षकांच्या
क्षमतासंवर्धन करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
प्रशिक्षण तपशील :
दि. 7 डिसेंबर 2020 पासून 30 ऑगस्ट 2021 पर्यंत PCMB विषयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या क्षमता
वाढीसाठी राज्य स्तरावर गुणवत्ता प्रशिक्षण डीपरतर्फे पूर्णतः मोफत दिले जाणार आहे. देशातील ही बहुधा पहिलीच
घटना असेल की राज्यातील शिक्षक आपल्या सहकार्यांना कोणतीही फी न आकारता विनामोबदला सलग 9 महिने प्रशिक्षित
करणार आहेत.
विषय वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे
वेळ : दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत स्थान : डीपर झूम लिंक
सोमवार : भौतिकशास्त्र
मंगळवार : रसायनशास्त्र
बुधवार : गणित
गुरुवार : जीवशास्त्र
शुक्रवार : MCQ तयारीचे सत्र
शनिवार : शिक्षकांसाठी तांत्रिक प्रशिक्षण
रविवार आढावा बैठक - श्री. हरीश बुटले आणि टीम डीपर (वेळ: सायं 4 ते 6)
(शैक्षणिक व कार्यकारी) सर्व मंडळे, समन्वयक, समिती सदस्य, तालुका व प्रभाग प्रतिनिधी.
1 नोव्हेंबरपासून पायलट प्रोजेक्ट करून बघितला असून PCMB विषयाच्या 900 शिक्षकांनी डीपरच्या पोर्टलवर नोंदणी केलेली आहे व ते ठरलेल्या दिवशी आपल्या विषयाचे प्रशिक्षण घेत आहेत.
प्रशिक्षक
गेल्या 14 वर्षांपासून डीपरची परीक्षा प्रथम क्रमांकावर ठेवण्यात सक्षम असलेले राज्यातील विविध नामांकित
कॉलेजेसचे PCMB विषयांचे तज्ञ असे विषयशिक्षक त्याचप्रमाणे आपापल्या विषयातील इच्छुक शिक्षक देखील आपल्या
आवडत्या विषयावर प्रशिक्षण देऊ शकतील.
हे प्रशिक्षण फक्त डीपरच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शिक्षकांसाठीच पूर्ण मोफत आहे. मीटिंगमध्ये
सामील होताना शिक्षकांनी आपले नाव आणि वापरकर्ता नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
वेबसाइट : www.deeper.co.in पोर्टल : safer.deeper.co.in
शिक्षकांनी या अधिकृत वेबसाइटवर Registration मेनूवर जाऊन Teacherम्हणून नोंदणी करावी.
एनईईटी / जेईई / एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत: ला सक्षम बनवा आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुसज्ज करा, असे आवाहन राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन सर्व शिक्षकांना डीपरतर्फे करण्यात येत आहे. चला आपण सर्वजण हे आव्हान सक्षमपणे पेलू या आणि राज्यातील निकालाच्या चिंताजनक परिस्थितीवर मात करू या!
समस्या काय आहे ?
निकालाची पार्श्वभूमी :
1) देशपातळीवर एकूणच गुणवत्तेत वाढ झालेली असली तरी 'नीट'च्या तयारीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड
प्रमाणात बोजवारा उडालेला आहे हे परत एकदा सिद्ध होतं. मागील वर्षीदेखील महाराष्ट्राची अशीच स्थिती
होती.
2) यावर्षी देशात सर्वात जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातून प्रविष्ट झालेले आहेत. महाराष्ट्रातून यावर्षी
2,27,659 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ती आणि त्यापैकी 1,95,338 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि
त्यापैकी केवळ 79,974 विद्यार्थी नीट च्या परीक्षेमध्ये पात्र ठरले, जे प्रमाण 40.94 टक्के आहे. हा निकाल
संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे.
3) महाराष्ट्राचा निकाल 40.94% एकूण 38 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 37 वा आहे ही बाब नक्कीच
लाजिरवाणी आहे.
4) जोपर्यंत दहावीच्या पातळीवर वाटणारी मार्कांची ही खिरापत थांबणार नाही तोपर्यंत देशपातळीवरील
स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कधीही उसळी घेऊ शकणार नाही. त्यामुळेच देशपातळीवरील कोचिंग क्लासेसच्या दृष्टीने
महाराष्ट्र ही बाजारपेठ म्हणून समजली जात आहे.
5) NEET-2020 मध्ये 2 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 गुण मिळाले आणि जवळपास 125 विद्यार्थ्यांना
700 पेक्षा जास्त गुण आहेत कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या जवळपास 5 महिन्याच्या जादा अवधीमुळे
विद्यार्थ्यांची भरपूर तयारी केली आणि पर्यायाने ऍडमिशनची चुरस वाढली. आपण आपल्या राज्यातील शिक्षणाची
गुणवत्ता वाढवण्यासाठी या दरम्यान काय केले ते प्रत्येक संबंधित घटकाने स्वतःला विचारले पाहिजे.
6) एकूण विद्यार्थी संख्येच्या जवळपास 14.25% टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातून प्रविष्ट होतात आणि केवळ
सहा-सात विद्यार्थी पहिल्या शंभरात दिसत असतील तर गुणवत्तेच्या पातळीवर फार मोठी शोकांतिका आहे. हे वास्तव
महाराष्ट्राने समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुरूप आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची क्षमता संवर्धनाची तयारी
केली पाहिजे.
7) यापुढे राज्यातील शिक्षण मंडळानी केवळ प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना न शिकवणार्या कॉलेजचा तातडीने
बंदोबस्त केला पाहिजे. तरच राज्याची गुणवत्ता ;नीट' / 'जेईई'सारख्या परीक्षांमध्ये वाढेल.
महाराष्ट्रातील वास्तव आणि प्रशिक्षणाची गरज :
1) महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसून देखील महाराष्ट्र राज्य NEET परीक्षांमध्ये देशातील
38 राज्य व केंद्रशासित प्रदेश मिळून 37 व्या स्थानावर आहे. हा निकाल मागील वर्षी देखील असाच होता. JEE
मध्ये देखील ही स्थिती फारशी समाधानकारक नाही आणि राज्याच्या MHT-CET परीक्षेत तब्बल 23 गुणांचे प्रश्न
चुकीचे होते. त्यामुळे देशपातळीवरील NEET/JEE व राज्य पातळीवरील MHT-CET मधील गुणवत्तेची वाढ करण्यासाठी
राज्यपातळीवर PCMB विषयाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे राज्यव्यापी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
2) 1 नोव्हेंबरपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रशिक्षणाचे कार्य सुरू झाले. त्यात आम्हाला मुख्यत्वे लक्षात
आले की 1 ते 15 वर्षांपर्यंत अनुभवी शिक्षकांची तांत्रिक बाजू भक्कम आहे. तर त्यांचा 25 ते 33 वर्षांचा
अनुभव आहे त्यांची विषयावर चांगली पकड आहे. काही प्रमाणात दोन्ही बाजू उत्तम असणारे शिक्षक आहेत. डीपर हा
असा सेतू आहे की ज्यावर दोन्ही प्रकारच्या शिक्षकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या क्षमतेचे आदान-प्रदान
करण्यासाठी वातावरण निर्माण करून त्याचा फायदा तळागाळातील सर्व घटकांना कसा होईल याचा कृतिशील विचार होतो
आहे.
3) आमच्या हे देखील लक्षात आले की शिक्षक HSC किंवा NCERT, 11 वी किंवा 12 वी अशी विषयाची विभागणी करतात
मात्र ‘डीपर’च्या व्यासपीठावर ‘बोर्ड’ किंवा ‘वर्ग’ विचारात न घेता ‘विषय’ पक्का करून घेण्यासाठी त्यातील
बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
4) अकरावी आणि बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी राष्ट्रीय व
राज्यस्तरावर प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना
कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला तरी प्रचंड स्पर्धेमुळे त्यांना राज्य मंडळाच्या परीक्षेसह प्रवेश
परीक्षेच्या अभ्यासाला तोंड देण्यासाठी विविध प्रकारे तयारी करावी लागते.
5) राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा अनिवार्य झाल्यापासून या तयारीचे आयाम बदलले आहेत. तालुका पातळीवर तयारी
करण्यासाठी देखील अकरावी आणि बारावीच्या वर्षात कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या खर्चासह
शिकवण्यांसाठी किमान 40 ते 50 हजार रुपये खर्च करावे लागतात. हाच खर्च जिल्ह्यात 1 लाख रुपये, महानगरपालिका
क्षेत्रात दीड ते दोन लाख आणि महानगर क्षेत्रात 2 ते 5 लाख असा येतो. आधीच ही किंमत सर्वसाधारण पालकांच्या
आवाक्याबाहेरची होती, आता तर कोरोना संकटामुळे बऱ्याच कुटुंबांना दोनवेळच्या उपजीविकेच्या चिंतेत असताना
शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवणे ही मोठी समस्या बनली आहे.
6) अशा परिस्थितीत जर गावातील विद्यार्थ्यांनी शहरातील विद्यार्थ्यांसमवेत चिकाटी ठेवण्यास सक्षम व्हायचे
असेल तर त्यांना अत्यल्प दरात ‘ऑनलाइन’ आणि ‘ऑफलाइन’ अभ्यास सामग्री उपलब्ध करुन द्यावी लागेल. त्यापलीकडे
जाऊन,ज्यांना हे शुल्कदेखील परवडत नाही त्यांच्यासाठी;त्यांना दत्तक/भेटयोजना किंवा समुदायाकडून देणगी
स्वरूपात मदत करण्याची सोय देखील करावी लागेल. एकंदरीत, पैशाअभावी कोणीही दर्जेदार शिक्षणापासून वंचित
राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. हे काम डीपरच्या व्यासपीठावरून सामाजिक भावनेने केले जात आहे.
7) आत्तापर्यंत, फक्त सराव परीक्षा डीपरकडून घेण्यात आल्या, त्याआधी, विद्यार्थ्यांना स्वतःला तयारी आणि
सराव करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागले. सरावाच्या दृष्टिकोनातून विविध पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी
शिक्षण क्षेत्रात एक उत्कृष्ट पीपीई (तयारी Preparation, सराव Practice आणि मूल्यांकन Evaluation)
करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या सेवा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील. अशाप्रकारे शिक्षण
क्षेत्रासाठी व्यापक सामाजिक हित लक्षात घेता, तळागाळातील अत्यंत गरीब व वंचितांचा फायदा होण्याच्या
भूमिकेसह आम्ही ‘डीपर’ची टीम आजपर्यंत आमच्या संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत.
Preparation तयारी - कोर्स नोट्स, रेकॉर्डेड व्हिडिओ, ऑनलाईन लेक्चर्स, सब्जेक्ट बुलेटिन देण्यात येतील.
Practice सराव - विषयनिहाय, अध्यायनिहाय, संपूर्ण लांबीच्या चाचण्या आणि अकराव्या तास तयारीच्या चाचण्या
घेतल्या जातील.
Evaluation मूल्यांकन - डीसीटी, मिरर आणि कसोटी यासारख्या सखोल दर्जेदार मॉक टेस्टमुळे विद्यार्थ्यांना नीट/
जेईई / एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थी त्यांच्या
आवडीनुसार, आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थ्यांसह पालक जागरूकता आणि प्रशिक्षण,
शिक्षक प्रशिक्षण देखील टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल.
8) या संपूर्ण प्रक्रियेत सामील असलेल्या राज्यातील नामांकित शिक्षकांद्वारे उत्कृष्ट ज्ञान आणि
अध्यापनाच्या अनुभवाचा उत्कृष्ट वापर करण्यासाठी डीपरने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. शिक्षकांचे ज्ञान आणि
अनुभव यांचे एकत्रीकरण करून, आम्ही लॉकडाऊन दरम्यान एक अत्यंत उच्च दर्जाचे ऑनलाइन पोर्टल SAFER ( Social,
Affordable, Fair, Excellent, Reasonable) तयार केले आहे.
9) त्या प्लॅटफॉर्मवरूनच दि. 7 डिसेंबर 2020 पासून 30 ऑगस्ट 2021 पर्यंत दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे NEET मध्ये दररोज एका विषयाचे प्रशिक्षण दिले
जाईल. या प्रशिक्षणातून प्रवेश परीक्षेसाठी उत्कृष्ट तयारी सामग्री नोट्स, व्हिडिओ, बुलेटिन, प्रश्न संच
तयार केले जातील.
‘डीपर’ ही गेल्या 14 वर्षांपासून राष्ट्रीय (एनईईटी / जेईई-मुख्य) आणि राज्य (एमएचटी-सीईटी) स्तरावरील
प्रवेश परीक्षा घेण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आत्मनिर्भर स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेत शिक्षण
क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक यांचे प्रतिनिधीत्व आहे. या
परीक्षेस बसणारे विद्यार्थी 11 वेळा राज्यात अव्वल आलेले आहेत आणि नीट (NEET) सुरू झाल्यापासून या
परीक्षेतील विद्यार्थी हॅट-ट्रिक घडवणारे स्टेट टॉपर आहेत. डीपरच्या सराव परीक्षा या महाराष्ट्र राज्यातील
सर्वात गुणात्मक, स्वीकार्य, विश्वासार्ह, अचूक आणि वाजवी अशा सराव (मॉक टेस्ट) परीक्षा आहे. यावर्षी 2020
वर्षी NEET मध्ये देखील 700 च्या वर गुण प्राप्त करणारे 4 विद्यार्थी असून राज्याच्या वैद्यकीय यादीनुसार
(मेरीट लिस्ट) प्रवेश घेणारा पहिला विद्यार्थी (SML-1) डीपरची परीक्षा देणाराच आहे. MHT-CET 2020 मध्येही
एकूण 7 विद्यार्थ्यांनी 100% परसेंटाईल मिळविले आहे. अधिक माहितीसाठी आमच्या www.deeper.co.in वेबसाइटला भेट
द्या.
रेजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे click
करा Network Registration Form
धन्यवाद !
हरीश बुटले
संस्थापक - सचिव, डीपर
मोबाईल : 9422001560
ई-मेल : harishbutle@gmail.com
हेल्पलाईन : 8605009231/32